शंकरनगर परिसराची पाहणी करीत मनपा आयुक्तांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शंकरनगर परिसराची पाहणी करीत स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी आमदार विकास ठाकरे व भागातील नागरिक उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी धरमपेठ झोनच्या अधिकार्‍यांसोबत इंदिरा गांधी रुग्णालय ते शंकरनगर दरम्याच्या बाभुळकर मार्गाचा दौरा केला आणि नाग नदीच्या काठावर असलेले झोपडे तत्काळ हटविणायचे निर्देश दिले. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी इंदिरा गांधी रुग्णालय ते शंकरनगर दरम्यानची पाहणी केली.

यावेळी आयुक्त चौधरी यांनी नाग नदीच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या झोपडे हटविण्याचे निर्देश दिले. याशिवाय तुटलेली सीवर लाइन तात्काळ दुरुस्त करून पुलाची दुरूस्ती करावी, रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या कापाव्यात आदी निर्देशित केले.

याप्रसंगी मनपाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, कनिष्ठ अभियंता मनोहर राठोड उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"बिहार व आंध्रप्रदेश"सारखे महाराष्ट्राला विशेष पॅकेज ही काळाजी गरज अन्यथा महायुतीचा दयनीय पराभव अटळ - किशोर तिवारी 

Mon Jul 22 , 2024
नागपुर :- अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेले २३-२४चे आर्थिक सर्वेक्षण एक मृगजळ असुन महाराष्ट्र सारख्या राज्याचे दिवाळे निघाले असुन मागील दहा वर्षात सरकारचे कर्ज सुमारे दोन लाख कोटीवरून चक्क सुमारे आठ लाख झाले असुन केंद्राच्या पंतप्रधान दिव्या स्वप्न असणाऱ्या घराच्या ,पिण्याच्या पाण्याच्या ,आरोग्याच्या ,ग्रामविकासाच्या ,महिला व बाळ कल्याणाच्या ,वीज निर्मिती ,सिंचन क्षमता वाढीसाठी योजना ,निवडणुकीच्या तोंडावर निधी नसतांना १ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com