पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेला प्रारंभ

पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात 32 संघांमध्ये जोरदार लढत

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर मंगळवारी 8 नोव्हेंबरपासून पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेला धुमधडाक्यात प्रारंभ झाला. विशेष अतिथी म्हणून उपस्थित संजय बाप्पा पाटील, कोल्हापूर आणि डॉ. पद्माकर देशमुख यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करुन या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अविनाश असनारे तसेच पाचही जिल्ह्रांमधील संलग्नित महाविद्यालयांचे संचालक, डॉ. उमेश राठी, डॉ. कल्याण मालुरे, डॉ. खुशाल आळसपुरे, वसंत ठाकरे यांचेसह इतर क्रीडा संचालक उपस्थित होते.

या स्पर्धेत गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र या पाच राज्यातील 66 संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात 32 सामने खेळले गेले, यापैकी 16 सामने दुस-या फेरीकरीता निश्चित झाले. तंत्रशुद्ध पद्धतीने तयार केलेली मैदाने, अनुभवी पंच, सोबतच प्रेक्षकांसाठी तयार केलेली गॅलरी व नयनरम्य निसर्ग परिसराने या स्पर्धेचे सौंदर्य वाढले, अशा प्रतिक्रिया विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंनी व्यक्त केल्यात. गतवर्षी विजयी झालेल्या संघांसोबत उपांत्य सामने खेळण्यासाठी निवड झालेल्या संघाला झुंजार लढत द्यावी लागणार आहे.

पहिल्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात अ विभागात पूल अ मध्ये देवी अहिल्या विद्यापीठ, इंदौर विरुध्द गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद, पूल ब मध्ये इन्स्टिटूट अॅडव्हॉन्स्ड स्टडीज इन एज्युकेशन, राजस्थान, पूल क मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती विरुध्द कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, पूल ड मध्ये भोपाळ नोबेल्स विद्यापीठ, उदयपूर (राजस्थान) विरुध्द बरकतुल्लाह विद्यापीठ, भोपाळ, ब विभागात पूल अ मध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विरुध्द जयनारायण व्यास विद्यापीठ जोधपूर, पूल ब मध्ये जनार्दन रायनगर राजस्थान विद्यापीठ, उदयपूर विरुध्द लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वालियर, पूल क मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विरुध्द महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पूल ड मध्ये भगवान महावीर विद्यापीठ, सुरत (गुजरात) विरुध्द केंद्रीय विद्यापीठ, गुजरात यांच्यात लढत झाली. क विभागात पूल अ मध्ये महाराजा गंगासिंह विद्यापीठ बिकानेर विरुध्द महाराजा क्रिष्णकुमारसिंहजी भावनगर विद्यापीठ, भावनगर, पूल ब मध्ये मारवाडी विद्यापीठ, राजकोट विरुध्द महाराजा सुरजमल ब्रिाजी विद्यापीठ, भारतपूर, पूल क मध्ये निरमा विद्यापीठ, अहमदाबाद (गुजरात) विरुध्द कोडी सर्वा विद्यालय, गांधीनगर (गुजरात), पूल ड मध्ये छिंदवाडा विद्यापीठ, छिंदवाडा विरुध्द डॉ. हरीसिंह गौर विद्यालय, सागर, ड विभागात पूल अ मध्ये महर्षि दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर विरुध्द मेवार विद्यापीठ, गंगरार चित्तोडगढ (राजस्थान), पूल ब मध्ये महाराजा छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ, छत्तरपूर विरुध्द पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर, पूल क मध्ये इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल विद्यापीठ, अमरकंटक विरुध्द इंडियन इन्स्टिटट ऑफ टिचर एज्युकेशन, गांधीनगर, पूल ड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विरुध्द गुजरात विद्यापीठ, अहमदाबात यांच्यात लढत झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचं समर्थन नाहीच! पण ‘हे’ शब्दही… फडणवीसांचा इशारा कुणाला?

Tue Nov 8 , 2022
मुंबई :- राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात होत्या, आंदोलन करत सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात होती. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून केली जात असून सत्तार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. त्याच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com