मागण्या मान्य करून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठीशी राहू : मुख्यमंत्री 

– ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश

– साखळी उपोषण ठरले पत्रकारांसाठी नवसंजीवनी

– शंभूराजे देसाई,  आमदार संजय गायकवाड यांचा बैठकीस पुढाकार

 नागपूर :- ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांच्या पुढे आलेल्या मागण्यांबाबत मी समिती नेमत आपल्या मागण्या तातडीने मार्गी लावतो. आम्ही पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या मागण्यांवर आयोजित केलेल्या बैठकीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. पंधरा मागण्यांमधील सहा मागण्या येत्या जानेवारीअखेर पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री यांच्या निर्णयाने राज्यातील पत्रकारांना नवसंजीवनी मिळाली आहे.

नागपूरमध्ये राज्यातील पत्रकारांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने साखळी उपोषण केले होते. या उपोषणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पदाधिकारी सहभागी झाले होते. या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली होती.

ज्या सहा मागण्यांना मुख्यमंत्री यांनी प्राध्यान्य दिले, त्यात पत्रकारांचे सेवानिवृत्ती वेतन अकरा हजारांवरून एकवीस हजार, सोशल मीडियाचे प्रश्न, जाहिरात वाटपाचे विषय, आदी विषयांचा यात समावेश होता. या संदर्भात तातडीने शासकीय अध्यादेश काढू, शासकीय समन्वयाअभावी कुणालाही त्रास होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्री शंभूराजे देसाई,  आमदार संजय गायकवाड यांच्याकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीचे कामकाज सुपूर्द केले. पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात माहिती महासंचालक ब्रिजेशकुमार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून, शासकीय मागण्या आम्ही तातडीने मंजूर करू, असे मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले. या बैठकीत अनिल म्हस्के प्रदेशाध्यक्ष ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, दिव्या भोसले राष्ट्रीय महासचिव, मंगेश खाटिक विदर्भ अध्यक्ष, आनंद आंबेकर राज्य उपाध्यक्ष, जितेंद्र चोरडिया शहर कार्याध्यक्ष चंद्रपूर, किशोर कारंजेकर, जिल्हा अध्यक्ष वर्धा, राजेश सोनटक्के विदर्भ संघटक, सचिन धानकुटे तालुका अध्यक्ष सेलू,नरेंद्र देशमुख विदर्भ उपाध्यक्ष, एकनाथ चौधरी जिल्हा सचिव वर्धा, कृष्णा सपकाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बुलढाणा यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतमालाचे मूल्यवर्धन करून विक्री केल्यास अधिक नफा - मुक्ता कोकड्डे

Wed Dec 20 , 2023
 – नागरिकांनी शेतमाल खरेदी करण्याचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांचे आवाहन  • जिल्हा कृषी महोत्सव व धान्य महोत्सवाचे उदघाटन  • शेतमालाची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री   • शनिवारपर्यंत चालणार महोत्सव नागपूर :- शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतमालाचे मूल्यवर्धन करावे. मूल्यसंवर्धित शेतमालाची विक्री केल्यास चांगला भाव मिळून अधिकचा नफा पदरी पडेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com