कोंढाळी :-सीतार -(वीणेच्या) तारेतून मानसिक ताण तणाव कमी करण्याचे एक माध्यम आहे. मानसिक स्वास्थ्य सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी सीतारे (वीणा वादन)चा संपूर्ण राज्यात व देशात प्रचार व प्रसार करण्यासाठी शाळा/ महाविद्यालये व अन्य सामाजिक व संगित संस्थांचे मध्यातून संपुर्ण राज्यात नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सुप्रसिद्ध सीतार वादक -विदुर महाराज यांनी नागपूर जिल्ह्यातील लाखोटीया भुतडा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व सी बी एस ई हायस्कूल चे अंदाजे २४०० विद्यार्थी विद्यार्थिनींना सीतार वादातून जीवनात मिळणाऱ्या मानसिक समाधान, त्यातून दैनंदिन कमी होणारा ताण तणाव त्यांनी सीतार वादनाचे प्रत्यक्षितातून समजावून सांगितले तसेच, वीणा वादातून मिळणारा भाव त्या भावाचा भावार्थ,. त्यातून उत्पन्न होणारी संगीत ईच्छा शक्ती क्षमता व उत्सुकता या बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे सीतार व संगीत, त्या बाबतीत विवीध पहलूंची उकल करवून दाखवली. सितार जग विख्यात कसे झाले. देशी संगीत आणि पाश्चिमात्य संगीताची माहीत विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
शिक्षणात संगीत व संगिताचे महत्त्व, राग व त्याचे अर्थ प्रात्यक्षिक गयण करून समजावून सांगितले. तसेच आपणच आपले जीवन आनंदमय कसे ठेवू शकतो याची जाणीव व जागृती या संगीताचे शैक्षणिक सांस्कृतिक आयोजन शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य सुधीर बुटे यांच्या अध्यक्षतेखाली, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य कैलास थुल, सी बी एस ई हायस्कूल चे उप प्राचार्य चौधरी, पर्यवेक्षक मनोज ढाले हरिष राठी परिक्षा प्रमुख प्रिया धारपुरे, सुनिल सोलव, यांचे उपस्थितीत प्रसिद्ध सितार वादक -विदुर महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व सी बी एस ई हायस्कूल चे हजारों विद्यार्थ्यांसमक्ष सीतार वादानातून संगीता विषयी महत्वाची माहिती सादर केली.
या प्रसंगी सीतारवादनाला हजारो विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्तम साद दिली. सीतार वादक -विदुर महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमांचे संचलन पर्यवेक्षक हरिष राठी तर आभार प्रा.वादाफळे यांनी मानले.