धम्मकार्याचा वारसा पुढे नेण्यात आम्ही आयुष्यभर सदैव तुमच्या पाठीशी – केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांची माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या निवासस्थानी सांत्वना भेट

कामठी :- माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांना झालेल्या मातृशोक संदर्भात केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांनी आज दुपारी 2 दरम्यान माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल जवळ असलेल्या निवासस्थानी सांत्वना भेट दिली. याप्रसंगी स्मूर्तीशेष नलीनीताई कुंभारे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत सुलेखा कुंभारे यांचे सांत्वन केले .दरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देत स्मूर्तीशेष आई नलीनीताई कुंभारे यांचे धम्मकार्यात मोठे योगदान असून त्यांच्या धम्मकार्याचा वारसा आपण पुढे घेऊन जात आहेत .हा धम्मकार्याचा वारसा वाहून नेण्यात ताई आम्ही सहभागी असून आयुष्यभर सदैव तुमच्या पाठीशी आहोत अशी मनधरणी सुद्धा यावेळी ना नितीन गडकरी यांनी केली.

याप्रसंगी आर्किटेकट हबीब खान, दिलीप मसे, डॉ सुरेंद्र वानखेडे,अजय कदम,रवी रंगारी,देवेंद्र जगताप,अरविंद वाडके ,अश्फाक कुरेशी, दिपंकर गणवीर,उदास बन्सोड,रवी ,सुशिल तायडे,अनुभव पाटील, मनीष डोंगरे, सुकेशिनी मुरारकर,रेखा भावे,रजनी लिंगायत,नंदा गोदघाटे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वारेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी काँग्रेसचे कमलाकर बांगरे विजयी

Sat Dec 30 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील वारेगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे कमलाकर बांगरे यांनी भाजप समर्थित गटाच्या कांचन गुंडाळे यांच्या दोन मताने पराभव करून उपसरपंच पदी विजयी झाले. आज वारेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदाकरिता सरपंच रत्नाबाई अजबराव उईके यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली होती उपसरपंच पदासाठी काँग्रेस समर्थक गटाकडून कमलाकर बांगरे यांनी तर भाजप समर्थित गटाकडून कांचन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!