प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पुर्व सूचना नोंदवाव्या

भंडारा :- प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना काढणी पश्चात अवस्थेत धानाचे पिक कापणी करून सुकवणी साठी शेतात पसरवून ठेवले असता गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी/ अवकाळी पाऊसामुळे नुकसान झाले असल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान मिळण्याची तरतूद आहे.

सद्यस्थितीत बिगरमोसमी/ अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे धान पिकाचे काढणी पश्चात नुकसान होण्याची शक्यता नाकारत येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीस नुकसानीची पुर्वसूचना (Intimation) देणे आवश्यक आहे. त्याकरीता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी चोलामंडलम जनरल इंन्शुरंस कं. लि. या विमा कंपनीच्या टोल फ्रि कंमांक 18002089200 वर पुर्वसूचना देण्यात यावी. किंवा केंद्र सरकारच्या क्रॉप इंन्सुरंस ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central वर क्लिक करून ॲप डॉऊनलोड करून नुकसानीची माहिती नोंदवून पुर्वसूचना दयावी.

विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंस ॲप (Crop Insurance App) / संबंधित विमा कंपनीचे टोल फ्रि क्रमांक /बँक /कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक असेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा उद्योग मित्र सभा संपन्न

Wed Nov 29 , 2023
भंडारा :- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र सभा आयोजित करण्यात आली. या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, अति.जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, इतर विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते. जिल्हयातील मे. अशोका ले-लॅन्ड व मे. सनफलॅग लि. या उद्योगांनी त्यांचे उद्योगांकडून निर्मित होणाऱ्या उत्पादनाबाबत व भविष्यात होणाऱ्या नियोजनाबाबत सादरीकरण केले. त्यांना लागणाऱ्या आवश्यक पार्टस करीता छोटया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com