वेकोलि सुरक्षा अधिकारीने केबल तार चोरून नेताना चार आरोपीना पकडले

संदीप कांबळे , कामठी

कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल, ९० हजार रू. चा मु़द्देमाल जप्त. चार आरोपीना अटक.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस पाच कि मी अंतरावर खदान नंबर चार येथुन चार आरोपीने संगणमत करून ७० एम एम पीवीसी आर्मर केबल ६० फुट किंमत ९०,००० रुपयाचा मुद्देमाल कापुन चोरी करून घेऊन जात असतांना दिसुन आल्याने कन्हान पोलीसांनी चार आरोपी ला अटक करित त्यांच विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.५) ला रात्री १ ते १:३० वाजता दरम्यान रविका़ंत रामदास कंडे वय ४३ वर्ष राह. चनकापुर काॅलोनी खापरखेड़ा हे स्टाफ सह वेकोलि परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना आरोपी १) किसन काशीराम धुर्वे वय १९ वर्ष २) रोहित काशी राम धुर्वे वय १४ वर्ष ३) राकेश जिवन मरकाम ४) कन्हैया काशीराम धुर्वे सर्व राह. ब्लॅक डायमंड स्टेडिय म जवळ खदान हयानी संगणमत करून ७० एम एम पीवीसी आर्मर केबल ६० फुट किंमत ९०,००० रुपया चा मुद्देमाल खदान नंबर चार येथुन कापुन चोरी करून घेऊन जात असतांना दिसुन आले. आरोपी हे अंधारा चा फायदा घेवुन पळुन जात असतांना वेकोलि सुरक्षा अधिकारी रविका़ंत कंडे यांनी सटाफ सह पाठलाग करून पकडले असता आरोपी १) किसन काशीराम धुर्व २) रोहित कासीराम धुर्व हे मिळुन आले व ३) राकेश जिवम मरकाम ४) कन्हैया काशीराम धुर्वे हे अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले. आरोपी किसन धुर्वे २) रोहित धुर्वे यांच्या जवळून ७० एम एम पीवीसी आर्मर केबल ६० फुट किंमत ९०,००० रूपया चा माल मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी रविका़ंत कंडे यांच्या तक्रारी वरून चार आरोपी ला अटक करून त्यांचा विरुद्ध अप क्र २६४/२०२२ कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात हे कॉ मोहन शेळके हे करीत आहे.

Next Post

खैरी गावात कायमस्वरूपी पोलीस चौकी केव्हा उभारणार :-सरपंच बंडू कापसे

Sat May 7 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 07:-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ क्र 5 हद्दीतील जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खैरी गावात मागील वर्षी दोन मृतदेह आढळल्याची घटना निदर्शनास आली तसेच विनायक नगर येथे मागील ऑकटोबर महिन्यात भालेराव यांच्या घरी चोरी झाली तसेच 22 नोव्हेंबर ला मध्यरात्री अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्र हातात घेत गावात शिरून बंद असलेल्या पोस्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com