धनगर समाजातील नवउद्योजक महिलांकरीता शासनाची स्टँड अप इंडिया योजना

गडचिरोली :- गडचिरोली जिल्हयातील धनगर समाजाच्या नवउद्योजक महिलांना सुचित करण्यात येते की, केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील महिलांकरीताच्या सवलतीस पात्र नवउद्योजक महिला लाभार्थ्यांना एकुण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांचे हिस्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के मर्जिन मनी उपलब्ध करुन देण्यास ( Front End Subsidy ) देण्यास इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती ,विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या दि. 06 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे.

सदर योजनेचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच योजनासंबंधाने अधिक माहितीसाठी कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली या ठिकाणी संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

NewsToday24x7

Next Post

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला.... सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री... या दिवशी होणार शपथविधी सोहळा....

Thu May 18 , 2023
कर्नाटक :- काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. पक्षाने पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्याकडे कर्नाटकची कमान सोपवली आहे. आणि डीके शिवकुमार हे राज्याचे एकमेव उपमुख्यमंत्री असतील. यासोबतच ते लोकसभा निवडणुकीपर्यंत कर्नाटक काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस पक्षाने सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com