मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार, सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

नवा आयोग नेमून मराठा समाजाचे विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करणार

 मुंबई :- मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. हे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नवा आयोग नेमून विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण परत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

आज सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, तसेच आमदार प्रवीण दरेकर, माजी न्या. एम जी गायकवाड, महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ, ॲड. विजय थोरात, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची बैठक झाली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की,क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, याशिवाय आपल्याला आता मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विस्तृत सर्वे करावा लागेल. हा सर्वे करतांना नेमण्यात येणारी संस्था सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असणे गरजेचे आहे. या संस्थेस सर्व प्रकारच्या सुविधा, मनुष्यबळ, प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात यावे.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या 3100 उमेदवारांना राज्य शासनाने अधिसंख्य पदावर नियुक्ती दिली आहे. सारथीच्या माध्यमातून समाजाच्या मुलांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुपर मॅक्स कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आरखडा सादर करावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Fri Apr 21 , 2023
मुंबई :- “कामगारांच्या उपजीविकेचे साधन असलेली ठाणे येथील सुपर मॅक्स कंपनी सुरूळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आराखडा आठवडाभरात सादर करावा,” असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांच्य प्रश्नांबाबतची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे झाली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित केले. बैठकीस कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे, बंदरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com