वेकोलि गोंडेगाव परिसरात अवैध चोरीचा पाच कोळसा टाल धाड, ५५. ७०० टन कोळसा जप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

वेकोलि सुरक्षा रक्षक, एमएसएफ व कन्हान पोलीसांची कार्यवाई, ४ आरोपीवर गुन्हा दाखल.

कन्हान : – वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान प्रतिबंधक क्षेत्रात गोंडेगाव वस्ती व भाटिया बंद कोल वासरी च्या मागे वेकोलि चा कोळसा चोरून वेगवेग ळया पाच अवैद्य कोळसा टाल सुरू असल्याच्या गुप्त माहीतीने वेकोलि सुरक्षा रक्षक, एमएसएफ व कन्हान पोलीसांची संयुक्त धाड मारून ५५.७०० टन कोळसा किंमत ४,४५,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोस्टे ला चार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.२४) मे ला रात्री १ वाजता वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान प्रभारी सुरक्षा अधिकारी हरिराम लालमोहन यादव वय ४३ वर्ष राह. नवीन टेकाडी कॉलोनी हे सुरक्षा रक्षक जंगलु वडान्द्रे, मोहम्मद वजीर, एमएसएफ चे जवान किशन बेलदार, आशिष तांडेकर, शैलेंद्र तायडे यांच्या सोबत गोंडेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहीती मिळाली की, गोंडेगाव भाटिया बंद कोल वासरी कंपनी च्या मागे अवैद्य कोळश्या टाल वर चोरी चा कोळसा असल्याची माहिती मिळाल्याने हरिराम यादव हे एमएसएफ चे जवान व कन्हान पोलीस यानी सयुक्त धाड मारली असता अवैध कोळशाचा ढिगारा आढळून आला. हा कोळसा आरोपी मिधुन नाडार चा असल्याने हरिराम यादव यांनी कर्मचा-या सोबत कोळसा ट्रक मध्ये पे लोडर ने भरला आणि कोळसा खदानच्या काटयावर त्याचे वजन केले असता कोळशाचे वजन १९.७५० किलो होते. ८ हजार रुपये प्रति टन प्रमाणे कोळशाची किंमत १,५७,६०० रुपये असुन कोळसा डेपो मध्ये जमा केला. कन्हान पोलीसांनी फिर्यादी हरिराम यादव यांच्या तक्रारी वरून आरोपी मिथुन नाडार विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.
ही कार्यवाई करून परत येताना गोंडेगाव वस्ती शितला माता मंदीर च्या मागे वेकोलि प्रतिबंधित क्षेत्रा त आरोपी १) मिथुन नाडार यांचे अवैद्य कोळसा टाल वर १३ टन १०० किलो किमत १, ०४,८०० रू. चा चोरीचा कोळसा मिळाला. २) उमेश पानतावने यांचे अवैद्य कोळसा टालवर ७ टन ३०० किलो कोळसा किंमत ५८,२०० रूपये, ३) भुंजग महल्ले यांचे अवैद्य कोळसा टालवर ६ टन १५० किलो किंमत ४९,२०० रूपये, ४) फारूख अब्दुला यांचे अवैद्य कोळसा टाल वर चोरीचा कोळसा ९ टन ४०० किलो. किमत ७५,२०० रूपयाचा मिळुन आल्याने वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी हरिराम यादव यांनी कर्मचा-या सोबत कोळसा ट्रक मध्ये पे लोडर ने भरला आणि कोळसा खदान च्या काटवर त्याचे वजन करून चार ही अवैद्य टालवरील कोळशाचे वजन ३५.९५० टन किंमत २,८७,४०० रूपये आणि बंद भाटिया कोल वासरी मागचा कोळशाचे वजन १९.७५० किलो होते. ८ हजार रुपये प्रति टन प्रमाणे कोळशाची किंमत १,५७,६०० रुपये असा पाच ही कार्यवाई तील एकुण ५५,७०० टन कोळसा किंमत ४,४५, ००० रूपयाचा जप्त करून गोंडेगाव खुली खदान च्या कोळसा डेपो मध्ये जमा करून कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी हरिराम यादव यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसानी आरोपी १) मिथुन नाडार राह. पवनी, २) उमेश पानतावने राह. कांद्री , ३़) भुंजग महल्ले राह टेकाडी, ४) फारूख अब्दुल राह. कांद्री यांचे विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान थानेदार विलास काळे यांचे मार्गदर्शनात पो हवा. मोहन शेळके हे करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Next Post

लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणाऱ्या माजी सैनिक पती सह पत्नीची आत्महत्या

Wed May 25 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी, ता.२५ : येथील छत्रपती नगरात राहणाऱ्या माजी सैनिक ४५ वर्षीय संजय शालीकराम गजभिये याने आपल्या राहत्या घरी फिनाईल पिऊन आत्महत्या केली तर संजय सोबत राहणाऱ्या ३५ वर्षीय कविता वानखेडे हिने विषारी पावडर खाऊन माहेरी काटोल येथे आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृतक संजयचे पहिले लग्न कामठी येथील एका अभियांत्रिकीची बहीण माधुरी नावाच्या मुलीसोबत झाले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com