पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची उपस्थिती

– महाराष्ट्रातील सहा मान्यवरांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची आज तिसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यासोबत महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, सुरेश खाडे, छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्व नेत्यांनी मोदींच्या शपथविधीचे कौतुक केले आणि देशाच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

या शपथविधी कार्यक्रमात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव , रक्षा खडसे, आणि मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील या शपथविधी सोहळ्यात उपराष्ट्रपती जयदीप धनखड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह देशातील विविध राज्यांचे प्रमुख, राजकीय नेते, उद्योगजगताचे मान्यवर आणि अनेक परराष्ट्र प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली. श्री मोदी यांनी आपल्या भाषणात सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या ऐतिहासिक सोहळ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली असून पुढील वर्षांमध्ये देशाच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जातील.

आज एकूण ७२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, यामध्ये ३० केंद्रीय मंत्री, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्री यांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तिर्थक्षेत्र रामधाम मनसर येथे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

Mon Jun 10 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – ग्रामिण खेडा पासुनच सर्व स्तरावर विद्यार्थ्या चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळालेच पाहिजे कन्हान :- तिर्थक्षेत्र रामधाम मनसर येथील मॉ गायत्री सभागृहात श्री चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठाण आणि रामटेक विधान सभा पत्रकार संघाच्या सयुक्त विद्यमाने इयता १० वी व १२ वी च्या प्राविण्य प्राप्त गु़णवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, उज्वल भविष्या विषयी मार्गदर्शन, स्नेहभोजन कार्यक्रम थाटात संपन्न झाला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com