नागपूर :- दक्षिण नागपूरच्या मानेवाडा परिसरातील सिद्धेश्वरी नगर गोंड मोहल्ला येथील 200 घरात (झोपड्या) अतिवृष्टीचे पाणी घुसले. त्यामुळे घरातील सर्व गृह उपयोगी सामान खराब झाले. शासनाने सर्वे च्या नावाखाली ठराविक वस्त्यांचा सर्वे केला. परंतु या झोपडपट्टीत अजूनही कोणी सरकारी कर्मचारी फिरकला नसल्याची तक्रार सिद्धेश्वरी नगरातील सामाजिक कार्यकर्ते तुफान उईके, एड वीरेश वरखडे व बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केली आहे.
ही वसाहत मनपाच्या हनुमान नगर झोन अंतर्गत येत असून प्रभाग 34 मध्ये हिचा समावेश आहे. या वसाहतीतील दीपक उईके, टारझन नेताम, सागर उईके, राजेश मडावी, नागेश उईके, नर्मद धुर्वे, मुंडु उईके आदींनी या वसाहतीत वसाहतीतील अतिवृष्टी ग्रस्तांचा व त्यांच्या नुकसानीचा विना विलंब सर्वे व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन केली केली.