पंचशील टॉकीज जवळील नाग नदीवरील नुकसानग्रस्त पुलाची होणार पुनर्बांधणी

नागपूर :- नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अशात पंचशील चौक येथे नाग नदीवर असणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला होता. आता या पुलाचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पुलाचा बांधकामासाठी जवळपास ६ कोटी खर्चाचा अंदाज असनू, याकार्यास किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी दिली.

नुकसानग्रस्त पुलाबद्दल नरेश बोरकर यांनी सांगितले की, पंचशील चौक ते झाशी राणी चौक या दरम्यान नाग नदीवर हा पुल बांधण्यात आला होता. ज्याची १९७४ साली रुंदीकरण व सुधारणा करण्यात आली होती. गेल्या शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओवरफ्लो झाल्याने नाग नदीला पूर आला आणि या पुरामुळे पुलाचा काही भाग क्षतिग्रस्त झाला आणि नदीत कोसळला. तेव्हापासून पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. आता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुलाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी जवळपास ६ कोटी रुपय इतका खर्च अपेक्षित असून, संपूर्ण कार्य पूर्ण होण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

सध्या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद असून, हलक्या वाहनांसाठी वाहतूक खुली करण्याकरिता प्रत्यन करण्यात येणार आहेत. पुलाची पाहणी केली असून, नुकसानग्रस्त भागाला सिमेंटच्या काठ्याने बंद करण्यात येऊन काही भाग वाहतुकीस खुला करण्याची शक्यता पडताळणी करण्यात येणार असल्याचेही बोरकर यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या मोहम्मद हाशिरची पॉवर लिफ्टिंग मध्ये राज्यस्तरावर निवड

Thu Sep 28 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- क्रीडा युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत क्रीडा समिती द्वारा आयोजित श्री कृष्णदास जा. जु. ग्रामीण सेवा महाविद्यालय आर्वी रोड, पिंपरी, वर्धा येथे आयोजित केलेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये विविध जिल्हा स्तरातून खेळाडू एकत्रित आले होते. त्यामध्ये एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा मोहम्मद हाशिर U-19 वयोगट, वजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com