वारेगाव-दहेगाव मार्गाला पडल्या भेगा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वारेगाव बाह्य वळण मार्गावरील वारेगाव -दहेगाव मार्गावर सिमेंट रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांना या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागत असून या मार्गावर पडलेल्या भेगा वाहनधा रकासाठी अपघाती मृत्यूचे निमंत्रण देत आहे.

सदर वारेगाव-दहेगाव सिमेंट मार्गाचे बांधकाम होऊन चार वर्षे लोटले मात्र या रस्त्याचे बांधकामात अनियमितता होत निकृष्ट बांधकाम झाल्याने या मार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत ज्या येथील वाहनधारकासाठी मृत्यूचे निमंत्रक ठरत आहे.

हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा यासाठी कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय महामार्ग क्र 1 उपविभाग नागपूर विभागाला निवेदीत केले.यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आचारसंहिता चे कारण दर्शवित निवेदनाला केराची टोपली दाखवत आचारसंहिता संपल्या नंतर रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले.मात्र रस्ता दुरुस्त झाल्यास प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करीत रस्ता बंद करण्याचा ईशारा दिला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनुस्मूर्तीच्या श्लोकांचा समावेश करू नये - माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

Thu May 30 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या नवीन अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीच्या श्लोकांचा समावेश करू नये अशी मागणी कांग्रेस पदाधिकारी व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे. शाळेमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्यापनात मनाचे श्लोक आणि भगवद् गीतेचा 12 वा अध्याय पाठ करावा लागणार आहे.राज्य शैक्षणिक संशोधन आणि परिषदेने जाहीर केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यात याबाबत सूचना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com