खुले नाट्य गृहाच्या मोकळ्या मैदानात आढळल्या मानवी कवट्या..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 7 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्टेशन मार्गावरील खुले नाट्य गृहाच्या एका मोकळ्या जागेत मानवी कवट्यासह इतर मानवी सांगाडे चे काही रुकडे आढळल्याची घटना आज सकाळी 11 दरम्यान निदर्शनास आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती हवेसारखी पोहोचताच बघ्यांची एकच गर्दी जमली असताना नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून पाहणी केली असता सदर मानवी कवटी व मानवी सांगाडे चे काही साहित्य हे बायो वेस्टेज प्रकाराचा एक भाग असून कदाचित हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले असून आरोग्य विभागातील प्रशिनक्षणार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांना शवविच्छेदन तसेच मानवी शारीरिक अभ्यास शिक्षण दरम्यान वापरण्यात येणारे मानवी कवटी व साहित्य असल्याचा तर्क लावण्यात येत आहे .याबाबतचे वास्तविक सत्य लवकरच पुढे येईल. मात्र आढळ लेल्या मानवी कवटी व मानवी सांगाड्याचे इतर तुकडे हे विविध चर्चेला उत देत आहेत मात्र पोलीस या सर्व नकारात्मक व संशयास्पद चर्चेला नाकारत असा कुठलाही विषय नसून कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून भंगार वेचणाऱ्याना ह्या मानवी कवटी साहित्य सापडले असून त्यांनीच सदर घटनास्थळी फेकले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी गुन्हे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे.एपीआय भातकुले व पोलीस सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com