संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 1-कामठी नगर परिषद निवडणुकीला काही दिवस शिल्लक असून निवडणुका कधी लागणार याबाबत अद्यापही कुणालाही माहीत नाही तरीही प्रभाग निश्चिती व प्रभागातील आरक्षण निघण्याच्या आधीच शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
अंतिम प्रभाग रचना ही 7 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे त्या प्रभाग रचनेवर 47 आक्षेपकर्त्यांनी आक्षेप नोंदविले असले तरीही शहरातील प्रभाग रचनेत फार काही बदल होतील याची शक्यता कमी आहे त्यामुळे राजकीय पक्ष आता पूर्णपणे कामी लागला असून मागील प्रभाग रचना व आरक्षणाचा अभ्यास करून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.ओबीसी आरक्षण मिळाले तर काय भूमिका घ्यायची किंवा नाही मिळाले तर कोण उमेदवार निवडायचा यासाठी आतापासूनच चाचपणी सुरू झाली आहे.योग्य उमेदवार कोंण राहील यासाठी प्रभाग निहाय बैठकीने आता जोर धरला आहे.त्यामुळे राजकीय वातावरण निर्मितीही होऊ लागली आहे.स्थानिक पातळीवर इच्छुकांनी जनसंपर्क सुरू केला आहे.पक्षातील नेतेही कामाला लागले आहेत .सात जून नंतर शहरातील प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट होणार आहे परंतु त्यापूर्वी पासून इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे.राखीव पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ही गती वाढल्याचे दिसून येत आहे.
–एकूण 34 उमेदवारात 22 च्या वर महिला उमेदवार निवडून येणार
-आगामी होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीत एकूण 17 प्रभाग राहणार असून 34 सदस्य राहणार आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 50 टक्के महिला राखीव जागा असल्याने अनेक ठिकाणी महिला आरक्षण मिळणार आहे जसे की एकूण 34 सदस्यपैकी 50 टक्के महिला आरक्षण नुसार 17 महिला सदस्य तर उर्वरित 17 सदस्यात 10 अनुसूचित जाती साठी आरक्षित राहील त्यात 5 एस सी महिला व 5 साठी आरक्षण होईल तर उर्वरित सात मध्ये एक अनुसूचित जाती व इतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी निवड होणार आहे यानुसार सभागृहात 22 च्या वर महिला उमेदवार नगरसेविका म्हणून निवडून येणार आहेत.इच्छुक उमेदवारांनी पुरुष आरक्षण मिळाले तर स्वता निवडणूक लढविणार जर प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यास घरातील कुणीतरी महिला उमेदवार उभे करणार अशी तयारी केली आहे.ऐन वेळी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर कोण उमेदवार कुठल्या पार्टी कडून वा कुठल्या प्रभागात लढेल हे वेळे पर्यंत सांगणे कठीण जाणार आहे.
प्रभाग निश्चिती व आरक्षण निघण्यापूर्वोच उमेदवारांची चाचपणी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com