ऑईल चोरी करणारे 3 चोरटे गजाआड

आशीष राऊत, खापरखेडा

खापरखेडा – पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत चनकापुर येथील विजय लक्ष्मणराव महाजन वय 55 वर्ष रा. वार्ड क्र.03 खापरखेडा यांच्या गोडाउन मधून 12 ऑईलचे पेट्या एकुन किमती 33,200 रूपयाचा माल अज्ञात चोरट्यान्नी चोरी करून नेले. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून कलम 461,380 भादवी अन्वये गुन्हा नोंद करन्यात आला होता. या प्रकरणी पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने रजत उर्फ विक्की दिलीप वाडीवा वय 23 वर्ष , पुणीत राजु भगत वय 21 वर्ष , अमित सुधाकर शंभरकर वय 21 वर्ष तिन्ही रा. जयभोले नगर चनकापुर यांना अटक केली. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुली दिल्ल्याने त्याचे कडुन 05 लिटर ऑईलचे 04 डब्बया, 01 लिटरचे 20 डब्बे असलेले 04 पेट्या व ईलेक्ट्रीक केबल असे किमती 33,200/- रूपायाचे आईल व केबल व गुन्हयात आरोपीनी वापरलेली हिरो स्पेंडर गाडी क एम. एच.40.सी.जी. 5895 किमती 40,000/-रू असा एकुन 73,200 /- रू च्या माल जप्त करण्यात आला. सदर गुन्हया मध्ये तिन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे तसेच तपास पोलीस हवालदार उमेश ठाकरे खापरखेडा करीत आहे.

सदरची कामगीरी हृदयनारायण यादव, पोलीस निरीक्षक, डी.बी पथकचे स.पो.नी दिपक कांक्रेडवार, पो.ह. उमेश ठाकरे, पो.ह. आशिष भुरे, पो.ना. प्रमोद भोयर, राजु भोयर, मुकेश बधाडे, पो.शि. नूमान शेख यांनी पार पाडली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com