अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या विधवेच्या बाळाची विक्री 

– डॉक्टर-नर्ससह ५ जणांवर गुन्हा दाखल 

– श्वेता सावळेच्या टोळीचे आणखी एक पाप

नागपूर : पतीचा खून झाल्यानंतर विधवा महिलेचे एका नातेवाईकाशी जुळलेल्या प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाली. ती गर्भपात करण्याच्या तयारीत असताना श्वेता सावळेच्या टोळीने गर्भवती विधवेच्या प्रसुती करून नवजात बाळाची परराज्यात पाच लाख रुपयांत विक्री केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने एका डॉक्टर-नर्ससह पाच जणांवर गुन्हे दाखल केले.

सूत्रांच्या माहितीनुसार, कोराडीमध्ये राहणारी ३० वर्षीय पीडित महिलेच्या पतीचा खून झाला. तेव्हापासून ती एकटी राहत होती. नातेवाईक असलेला विवाहित युवक तिच्या घरी यायला लागला. त्याची पत्नीसुद्धा प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यामुळे तोसुद्धा एकटा होता. एकटी असलेल्या विधवा महिलेचे आणि युवकाचे सूत जुळले. दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वर्षभर सोबत राहिल्यानंतर विधवा गर्भवती झाली. त्यामुळे दोघेही गोंधळले. ती सप्टेबर २०१२१ मध्ये आरोपी डॉ. नितेश मौर्य (३७ रा.मनीष नगर, सोमलवाडा) याच्या क्लिनिकमध्ये गेली. तेथे रेखा पुजारी (रा. नारा रोड, निर्मल कॉलनी) या परिचारिकेने तिला विश्वासात घेतले. डॉ. मौर्य आणि रेखा यांनी गर्भवती महिलेला नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख आरोपी आयेशा खान हिच्याकडे पाठविले. पती मकबूल खान अहमद खान पठाण, दलाल सचिन रमेश पाटील यांनी संगनमत करून तिला गर्भपाताऐवजी तिला बाळाची वाढ होणारे औषधी दिल्या. मला सूनेसाठी बाळ दत्तक घ्यायचे असल्याचे सांगून बाळाला जन्म देण्यास भाग पाडले. त्यामुळे विधवा महिलेनेही बदनामीपासून वाचण्यासाठी बाळ लगेच देऊन मोकळे होण्याचा निर्णय घेतला. मार्च २०२२ मध्ये आयेशाने गर्भवती महिलेला बालाघाटमधील बनावट क्लिनिकमध्ये दाखल केले. गर्भवतीच्या जीवाची पर्वा न करता बळजबरी शस्त्रक्रिया करून पोटातून बाळ काढले. अवघ्या दोन दिवसांच्या बाळाची आयेशा खानने परप्रांतात पाच लाखांत विक्री केल्याची माहिती समोर येत आहे.

असा लागला छडा 

गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी नवजात बाळांच्या विक्रीची माहिती गोळा केली. त्यात आयेशाच्या टोळीने आणखी बाळाची विक्री केल्याचे लक्षात आले. संकपाळ यांनी लगेच डॉ. सुनील मौर्य आणि रेखा पुजारी यांची चौकशी केली. रेखा हिने आयेशाच्या मदतीने बाळ विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरून कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ, गजानन चांभारे, मनिष पराये, ऋषिकेश डुंबरे, शरीफ शेख आणि पल्लवी वंजारी यांनी केली.

डॉक्टर-नर्सची टोळी पुन्हा सक्रिय

टोळीप्रमुख श्वेता सावळे ऊर्फ आयशा खान हिने आतापर्यंत अनेक नवजात बाळांची विक्री परराज्यात केली असून त्यामधून कोट्यवधीचा व्यवहार केला आहे. आयशाने शहरातील अनेक हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स यांना हातीशी धरून अवैध गर्भपात करणाऱ्या तरूणी आणि महिलांना पाठविण्यासाठी कमिशन देणे सुरू केले होते. शहरातील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या तरी आणि महिलांना आयेशा खानकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com