ग्रीन शाईन लॉन मधील जुगार अड्यावर धाड,26 जुगारी अटकेत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-2 लक्ष 70 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 14 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा रोड वरील ग्रीन शाईन लॉन मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही काल 13 मे ला सायंकाळी साडे सहा दरम्यान केली असून या धाडीतून 52 तास पत्त्यासह नगदी 51 हजार 160 रुपये , 42 तास पत्ते किमती 30 रुपये व विविध कंपनीचे वेगवेगळे महागडे 15 मोबाईल असा एकूण 2 लक्ष 70 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेल्या 26 जुगाऱ्याना मु.दा.का.कलम 4,5अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.
अटक 26 जुगाऱ्यात नावेद अखतर मो जाहीर वय 32 वर्षे रा लकडगंज, नईम शेख शेख इसमत अली वय 27 वर्षे रा. टेका नाका नागपूर, मोहम्मद इलियाज मो अफरोज वय 23 वर्षे रा लकडगंज कामठी, अब्दुल खालिद मो जाहीर वय 35 वर्षे, रा लकडगंज कामठी, मो इमरान मो इकबाल वय 34 वर्षे रा बी बी कॉलोनी कामठी, मो मुसताक मो इकबाल वय 23 वर्षे,रा सैलाब नगर , शाबीर अहमद मो तय्यब वय 35 वर्षे रा बी बी कॉलोनी ,मो हारून हमीद अहमद वय 38 वर्षे रा लकडगंज कामठी, वकील अहमद दिन मोहम्मद वय 52 वर्षे रा घोरपड, कामठी, मो रमजान अब्दुल समद वय 35 वर्षे रा लकडगंज कामठी,मो शफीफ मो नासिर वय 28 वर्षे रा लकडगंज ,मो शफीफ मो नासिर वय 28 वर्षे, मो इमरान मुमताज अहमद वय 33 वर्षे दोन्ही राहणार लकडगंज कामठी, शेख अथर मो याकूब वय 34 वर्षे रा फुटाना ओली कामठी, मो सजाद मो शाहिद वय 25 वर्षे रा लकडगंज कामठी,अब्दुल बारी मो शफी वय 22 वर्षे रा भाजीमंडी,सलीम अहमद अनिस अहमद वय 32 वर्षे रा लकडगंज,आमिर खान एहसान खान वय 18 वर्षे इस्माईलपुरा , शकील अहमद जमिल अहमद वय 27 वर्षे रा वारीसपुरा, मुशिल रियाज वय 30 वर्षे रा वारीसपुरा कामठी,सलमान अन्सारी अफजल अन्सारी वय 23 वर्षे रा लकडगंज, मो सरफराज मुमताज अहमद वय 40 वर्षे रा लकडगंज, मो इमरान जलालूद्दीन वय 30 वर्षे रा तंबाकूओली कामठी, मोहसीन अन्सारी अब्दुल रशीद वय 35 वर्षे रा लकडगंज , मोहम्मद आवेश मो अफजल वय 24 वर्षे रा लकडगंज कामठी, हबीबुल रहमान अब्दुल हमीद वय 30 वर्षे रा लकडगंज कामठी तसेच ग्रीन शाईन लॉन चे मॅनेजर रियाजुद्दीन खान जानी बाबू खान वय 46 वर्षे रा संजय नगर कामठी चा समावेश आहे.
ही यशस्वी कार्यवाही डीसीपी चिन्मय पंडित, एसीपी नयन आलूरकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार, डी बी स्कॉड चे सुरेंद्र शेंडे, संदीप सगणे, कनोजिया, संदेश शुक्ला, अनिकेत सांगळे आदींनी केली .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भविष्यात नागपुरातून धनराज पिल्लेंसारखे खेळाडू पुढे यावेत : नितिन गडकरी 

Sat May 14 , 2022
दिनेश दमाहे ,मुख्य संपादक – खासदार क्रीडा महोत्सवाचे पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते थाटात उद्घाटन नागपूर : खेळातून व्यक्तित्व आणि चरित्राचा विकास होतो. आज तंत्रज्ञानात गुरफटत चाललेल्या मुलांना मैदानात खेळण्यासाठी आणण्याची गरज आहे. नागपूर शहरातील सुमारे १ लाख खेळाडू शहरातील ४५०च्या वर मैदानावर खेळत राहावे व त्यातून त्यांनी आपले शहर आणि देशाचा विकास करावा हा खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्देश आहे. शहरातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com