बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे विकास पुरुष नितीन गडकरी यांचे कले अभिनंदन..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

-बहुजन रिपब्लिकन एकता मंच पूर्ण ताकदीने विकास पुरुष नितीन गडकरी यांच्या पाठीशी-ऍड सुलेखाताई कुंभारे

कामठी ता प्र 20:-नागपूर लोकसभा मतदार संघातून केंद्रिय मंत्री ना नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका ऍड सुलेखाताई कुंभारे व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केला.याप्रसंगी नागपूर लोकसभा मतदार संघातून विकास पुरुष नितीन गडकरी यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याकरिता बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते हे ताकदीने काम करतील असे मौलिक वक्तव्य करून ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी आश्वस्त केले.

याप्रसंगी वीरेंद्र शाहू,डॉ सुरेंद्र वानखेडे,रवी रंगारी,अरविंद वाळके,थुल गुरुजी,अशोक नगरारे, संदीप कांबळे,विलास चंदनखेडे,आनंद नाईक,निशांत फुले,हर्षोय मेश्राम,नंदा गोडघाटे,जया पानतावणे,रत्नमाला मेश्राम,विशाखा कांबळे,सविता पाटील, लक्ष्मी ढोके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी विधानसभा मतदार संघातील लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा..

Wed Mar 20 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 20:-केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमानुसार रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांनी कामठी तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूमची सखोल पाहणी करून संबंधित नोडल अधिकारी , सहकारी अधिकारी यांच्याशी वार्तालाप करून कामठी विधानसभा मतदार संघातील लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा पूर्वतयारीचा आढावा घेतला.आदर्श […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com