नागपूर :- भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला असून नोंदणीसाठी पात्र असलेल्या मतदारांनी मतदान यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून दिनांक १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार यांनी मतदार यादीसाठी नोंदणी करावी. त्याअनुषंगाने १ जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असेलेले अर्जदार आणि त्यापूढे १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर पात्र मतदाराच्या अर्जावर निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करुन अंतीम मतदार यादी अद्यावत करण्यात येणार आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमधील आपले नाव नोंदवावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी हिंगणा यांनी केले आहे.
दिनांक १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. पुनरीक्षण कार्यक्रमाबद्ल एकत्रिकृत प्रारुप मतदान यादी मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात येईल. दावे व हरकती दिनांक १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत स्विकारण्याचा कालावधी आहे. मंगळवार दिनांक २६ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. शुक्रवार दिनांक ५ जानेवारी रोजी मतदार यादी अंतीम प्रसिध्द करण्यात येईल.
@ फाईल फोटो