नागपूर, ता. ८ : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून प्रभाग क्र. १७ मध्ये निर्माण झालेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण मंगळवारी (ता. ८) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गुजरवाडी येथे महापौर निधी अंतर्गत परिसरातील सौंदर्यीकरण कामाचे सुद्धा महापौरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रभाग १७ चे नगरसेवक प्रमोद चिखले, प्रकाश मोरे, रवींद्र कुंभलकर, प्रविण भगत, राजुभाऊ जाधव, राकेश भोयर, देशकर, संदिप माने, अरुण गाडगे, राजु डेकाटे, नरेंद्र गौतम, मिथुन भोंदले, निरजा पाटील, संध्या आसोले, अनिता शर्मा, सावंत, मेघा शिंदे, साधना सेलोकर आदी उपस्थित होते.