कन्हान :- टेकाडी गावाच्या प्रवेशद्वारा नजीक असलेल्या रहिबियर बार विरोधात ग्रामस्थ आक्रमक ; नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी वासी क्षेत्रात सुरू होणार असलेल्या बार अँड रेस्टॉरंट विरोधात आक्रमक ग्रामस्थांनी टेकाडी ग्राम पंचायत (को.ख) कार्यालयात धडक दिली.नाहरकत प्रमाणपत्र दिल्या संदर्भात विरोध म्हणून गावातील युवकांनी सरपंच विनोद इनवाते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सोबत नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्या संदर्भाचे निवेदन दिले आहे.
अत्यंत वर्दळीचा रहदारी असलेला महामार्गाला लागून गावातील मुख्य रस्ता आहे,ज्याच्या प्रवेशद्वाराजवळ बार अँड रेस्टॉरंट उदघाटनाच्या प्रतीक्षेत असून लवकरच सूरु होणार आहे, बारपासून काही अंतरावर शाळा असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्याची कायम वर्दळ असते.याशिवाय टेकाडी गावातील ग्रामस्थांचाही येण्या-जाण्याचा हाच मार्ग आहे.शाळकरी मुलांसमवेत गावातील महिला पुरुष वर्गाला जाण्यासाठी एकमात्र हाच रस्ता आहे,बार सुरू होत असलेल्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर श्री रामाचे देऊळ आहे.त्याच परिसरात मोठ्या प्रमानात लोकवसाहत आहे.
अश्यात सदर बार सुरू झाल्यास मोठ्या प्रमानात असामाजिक तत्वासोबत मद्यप्रेमींचा वावर रस्त्यावर वाढणार असून रात्री अपरात्री ज्याचा धोका गावातील महिला शाळकरी विद्यार्थी व परिसरातील सुज्ञ नागरिकांना होणार नाही याची शक्यता नाकारता येत नाही अश्यात बार अँड रेस्टॉरंट सुरू होणार असल्याची माहिती गावातील युवावर्गाला मिळताच आक्रमक युवावर्ग टेकाडी ग्राम पंचायत (को.ख) कार्यालयावर धडकले आणि सरपंच विनोद इनवाते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार स्वरूपात बार ला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा निषेध व्यक्त केला असून निवेदनाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली असून ज्यांनी बार अँड रेस्टॉरंट ला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव घेतला त्याची प्रोसेडिंग सार्वत्रिक करण्याची मागणी केली आहे.निवेदन देतांना सुनील लेकुरवाळे,हेमंत राऊत,नंदकिशोर लेकुरवाळे,श्रीकांत राऊत,मारोती हूड,मनोज लेकुरवळे,सचिन कांबळे,अमित वासाडे,कांतेश सातपैशे,अभिजित ठाकरे,जितेंद्र चव्हाण,कुणाल वासाडे,सचिन कांबळे,सतीश घारड,विनोद हुळ,%