येरखेडा येथे सार्वजनिक मातामाय मंदिरात गाव पूजा मोठ्या उत्साहात साजरी

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी

– गावकऱ्यांनी 100 वर्षाची परंपरा कायम ठेवली

कामठी – तालुक्यातील येरखेडा येथील गावकऱ्यांनी सार्वजनिक मातामाय मंदिरात गाव सार्वजनिक गाव पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली इंग्रजाचे काळात 100 वर्षांपूर्वी येरखेडा गावचे सदाशिवराव पाटील यांनी गावात नैसर्गिक आपत्ती येऊ नये, पीक पाणी मोठ्या प्रमाणात व्हावे, गावात विविध जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन समाजात राष्ट्रीय एकता निर्माण होऊन सुख शांती राहावी या उदात्त हेतूने सार्वजनिक माता माय मंदिराची स्थापना करून सामूहिक गाव पूजेला सुरुवात केली होती तीच परंपरा कायम ठेवत गावकरयानी दरवर्षी जुलै महिन्यात सार्वजनिक माता माय मंदिरात गाव मोठ्या उत्साहात साजरी करीत असतात यावर्षी सुद्धा नारायण पांडे महाराज भगत यांचे हस्ते श्रीशेत्र महादेव घाट कन्हान नदी येथे पूजा, आरती करून जलकलस यात्रेला सुरुवात करण्यात आली जल कलश यात्रेने आणलेले जल सार्वजनिक माता माय मंदिरात मूर्तीचे जलअभिषेक करून सार्वजनिक पूजेला सुरुवात करण्यात आली.

सार्वजनिक पूजा पार पडल्यावर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जल कलेश यात्रेत अनिल मुपीडवार ,पोलीस पाटील बबन काळे ,बाबाराव पुंजारवार ,गणपतराव धारमरे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण लुटे ,बाबुलाल सरीले, दिनेश महाले ,रामचंद कुथे, अनिल चव्हाण, सखुबाई ठाकरे ,सरुबाई उईके ,कुंदा काटोले, रेश्माबाई वाढवे, प्रमिला शेंद्रे ,कुसुम कोलतेवार सह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सरांडी में प्रहार जनसक्ती पक्ष की शाखा स्थापित

Fri Jul 8 , 2022
अमरदिप बडगे  गोंदिया – तिरोडा तालुका के ग्राम सरांडी में बच्चु कडू प्रहार जनसक्ती पक्ष के संस्थापक के जन्मदिन मौके पर प्रहार जनसक्ती पक्ष की शाखा स्थापित हुई। शाखा का उध्दाटन प्रहार जनसक्ती पक्ष के जि.अध्यक्ष महेन्द्र भांडारकर के हाथों से किया गया। इस अवसर पर प्रमुखता से वनीता भांडारकर पंचायत समिति सदस्य, प्रदिप निशाने तहसील अध्यक्ष, शाखा प्रमुख सरांडी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com