#उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे यांनी केला सत्कार
#अभ्यासाच्या सातत्यामुळे यश मिळाले
काटोल :- नुकताच जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेत काटोल तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत असणारे भागवत पाटील यांनी 61 वी रँक मिळवत वर्ग -1 पदावर स्वतःचे नाव कोरले.
त्यांच्या यशाबाबत तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे यांच्या शुभहस्ते पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी तहसीलदार राजू रणवीर, नायब तहसीलदार विजय डांगोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना पाटील म्हणाले, मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करीत होतो. मात्र राज्यसेवेत यश मिळाले. मेहनत, चिकाटी व अभ्यासाचे सातत्य या बळावर हे यश मिळाले आहे.
पाटील हे मूळचे लातूर जिल्ह्याचे आहे. एक नम्र अधिकारी व गोरगरिबांना शासकीय लाभ मिळवून देण्याकरिता तत्पर असणारा अधिकारी म्हणून काटोल परिसरात त्यांची ओळख आहे.त्यांनी आजपर्यंत हजारो निराधार व बेवारसांना लोकांना लाभार्थी म्हणून सेवा दिलेली आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सतत मार्गदर्शन करीत असतात.