संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारत सरकारच्या महत्वकांक्षी योजनांचे लाभ लक्षीत वंचित लाभार्थ्या पर्यंत पोहोचवावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देहव्यापी मोहीम आखण्यात आली असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी नगर परिषदचे मुख्याधिकारी व प्रशासक संदीप बोरकर यांनी विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात व्यक्त केले.
केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले मात्र अद्यापही ज्यांना लाभ मिळू न शकलेल्या पात्रता धारक व्यक्तीपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचावा म्हणून केंद्र शासनातर्फे कामठीत 30 व 31 डीसेंबर विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार कामठी नगर परोषद तर्फे आयोजित राम मंदिर चौक संघ मैदान व नगर परिषद कामठी येथे विकसित भारत संकल्प यात्रा उत्साहात संपन्न झाली.दरम्यान कार्यक्रमात सहभागी अतिथीगन,पदाधिकारी, कर्मचारी,बचत गटातील महिला व नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत हमारा संकल्प विकसित भारत -समृद्ध भारत शपथ घेतली.
यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती एलईडी व्हॅनमार्फत देण्यात आली यात्रे दरम्यान लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले तसेच लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड , घरकुल योजना चा लाभ,स्थायी पट्टा वितरण करण्यात आले.यात्रेत प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्वला गॅस नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, बँकांमार्फत विविध कर्ज योजना,आरोग्य शिबीर,प्रधानमंत्री आवास योजना,आधार कार्ड नोंदणी,मुद्रा कर्ज योजना आणि इतर योजनांचा अर्ज नोंदणी करीत लाभ ही देण्यात आला .यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना योजनेच्या माहिती पूस्तिकेचे वाटप करण्यात आले.यावेळी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात मुख्याधिकारी संदीप बोरकर, आबासाहेब मुंडे, अमोल कारवटकर , प्रदीप भोकरे, विजय मेथीयां, धर्मेश जैस्वाल, रुपेश जैस्वाल,रंजीत माटे,प्रदीप तांबे, विशाल गजभिये, घोडेस्वार मॅडम,मंगेश खांडेकर ,वरिष्ठ नागरिक गण,आशा वर्कर, बचत गट अध्यक्ष, व लाभार्थी तसेच विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.