– बिबट्याच्या पंज्याचे ठसे आढळल्याने रिधोरा परिसरात दहशत
काटोल :-गेल्या अनेक वर्षापासून रिधोरा बोरखेडी कोकर्डा या भागात वाघ असल्याची ओरड अनेक शेतकरी करीत आहे काही शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन सुद्धा झाले होते नुकतेच शुक्रवारला किरण टालाटुले यांच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळून आल्यामुळे एकच दहशत पसरली पंजे आढळून आल्याची माहिती गावकऱ्यांनी कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिले वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सदर शेताची पाहणी करून शेतकऱ्यांना वाघाच्या दहशतीपासून कसे वाचवता येईल याबद्दल योग्य ती कारवाई करू असे सांगितले बिबट्याच्या पंजाची ठसे पाहण्यासाठी गावकऱ्यांनी अलालोट गर्दी केली होती तसेच वाघ आला रे वाघ आला अशा बोंबा ठोकत काही नागरिक गावात गेले त्यामुळे गावात वाघाच्या दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे आता आपण शेतात कसे जावे असा विचार शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसलेला आहे यावर लवकरात लवकर तोडगा काढून वनविभागाने शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करावी असे आवाहन रिधोरा ग्रामस्थांनी केले आहे.