विकास ठाकरेच बनणार नागपूरचे खासदार, काँग्रेसचा गड आम्ही परत मिळवू – मुकुल वासनिक

नागपूर :- नागपूरकरांच्या नस-नसात काँग्रेस असून नागपूर म्हणजचे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यंदा हा काँग्रेसचा गड आम्ही परत मिळवणार आहोत. तसेच विकास ठाकरेच नागपूरचे खासदार बनणार असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी सांगितले.

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तमेवार यांच्या घराजवळ भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या अवैध आंदोलनावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, “जन सामान्यांकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालली वाळू घसरली आहे. त्यामुळे असे कृत्य करण्यात येत आहे, मात्र यंदा विकास ठाकरेंचा विजय निश्चित आहे. नागपूरची लोकसभा निवडणूक फक्त नागपूरपुरतीच मर्यादीत नसून ही देशाची लढाई आहे आणि विकास ठाकरेच जिंकत असल्याचा संदेश देशभरात पोहोचत आहे. तसेच देशात इंडिया आघाडीचे सरकार निवडून येत आहे.”

इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेअंतर्गत शनिवारी सकाळी मध्य नागपुरातील नागरिकांशी नेत्यांनी संवाद साधला. यावेळी प्रामुख्याने माजी मंत्री अनिस अहमद, बंटी शेळके, अतुल कोटेचा, किशोर पराते, कांद्रिकर यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यात्रेत नागरिक स्वतः उत्स्फूर्तपणे सहभागी झाले असून त्यांनी यंदा परिवर्तन घडणारच अशी हाक दिली.

*रविवारी पश्चिम नागपुरात जन आशीर्वाद यात्रा*

रविवारी (ता. ७ एप्रिल) पश्चिम नागपुरात जन आशीर्वाद यात्रा निघणार असून सकाळी आठ वाजता वंजारी माता मंदिर येथून यात्रेला सुरुवात होईल. भीनसेन चौक शिवमंदिर-चौरसिया चौक-पोस्ट ऑफिस शिवाजी डेकोरेशन-छोटा गड्डीगोदाम-कामठी चौक-धोबीपुरा-शितलामाता मंदिर-राजभवन भित-गवलीपुरा-जैन मंदिर-ईदगाह-गांधी चौक येथे सकाळच्या सत्राची यात्रा समाप्त होईल.

सायंकाळी पूर्व नागपुरात जाहीर सभा

रविवारी सायंकाळी शिनगर, भांडेवाडी पारडी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रामुख्याने माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तमेवार, डॉ. सतीश चतुर्वेदी, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार अभिजीत वंजारी नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ना.गडकरींचा एलआयसी कर्मचाऱ्यांशी संवाद

Mon Apr 8 , 2024
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) आजी-माजी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. एलआयसी परिवाराच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात स्नेहमिलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला निलेश साठे, दीपक मोघे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘गेल्या दहा वर्षांपासून मी तुमच्या आशीर्वादाने नागपूरचा खासदार आहे. मी निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्रीपद मिळाले. त्यानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com