मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.
वन्यजीव प्राणी हे निसर्ग साखळीतील महत्वाचा घटक असून प्राणी, पक्ष्यांशिवाय मानवी जीवनाचा समतोल साधणे अशक्य आहे. निसर्ग साखळीतील वन्यजीव प्राण्यांचे महत्व लक्षात घेऊन शासनस्तरावर त्यांच्या अधिवासाचे जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठीच मुंबई महानगरालगत असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव प्राण्यांची कशा प्रकारे काळजी घेण्यात येत आहे, तेथील जैवविविधता याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि.22, बुधवार दि.23 आणि गुरुवार दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.