संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सभा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- समाजात उपेक्षित जीवन जगणाऱ्या दिव्यांग, विधवा, परितक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध अर्थसहाय्य योजना चालवल्या जातात. परंतु यासाठी लाभार्थी निवडीची जबाबदारी असलेल्या तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची मुख्य भूमिका असते .तेव्हा ही लाभार्थी निवड करतेवेळी लाभार्थी अर्जदाराच्या अर्जाला जोडलेली कागदपत्राची योग्य ती शहनिशा करून लाभ मिळवून देणे तसेच कोणताही लाभार्थी या योजनेच्या लाभापासून विनाकारण वंचीत राहणार नाहो याची दक्षता घेत कामठी तालुकास्तरीय नियुक्त केलेली संजय गांधी निराधार योजना समितीचे पदाधिकारी व सदस्य मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारत असल्याचे मौलिक मत संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे कामठी तालुकाध्यक्ष रमेश चिकटे यांनी आज कामठी तहसील कार्यालयात आयोजित संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत व्यक्त केले.

या बैठकीत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्जदारांनी केलेल्या अर्जाची व सोबत जोडलेल्या कागदपत्रांची चाचणी करण्यात आली यातील योग्य लाभार्थ्यांची निवड करून नियमबाह्य लाभार्थ्यांच्या अर्जाला वगळणे कामाला गती दिली होती . याप्रसंगी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चे कामठी तालुका अध्यक्ष रमेश चिकटे ,सदस्य संजय कनोजिया, ,विजय कोंडूलवार, विशाल चामट, सविता जिचकार,राजकीरण बर्वे, बापूराव सोनावणे, संजय मोरे,खेमराज हटवार , राजीव भोरे,एम एस वकील प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती कामठी चे तालुकाध्यक्ष रमेश चिकटे यांनी सांगितले की ६५ वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी भूमीहीन शेतमजूर योजना तसेच विधवा, परितक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी संजय गांधी स्वावलंबन योजना चालविली जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रतीमहा अर्थसहाय्य बँक खात्यात जमा होते. तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ६० वर्ष वयोगटातील कमावत्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना चालविली जाते. या कुटुंबास २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. व महसूल विभागाच्या अखत्यारीतील या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीकडून केली जाते हे इथं विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि खदानचा कोळसा चोरुन वाहतुक करणारी कार पकडली

Wed Sep 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कोळसा व वाहना सह एकुण ४८६० रु मुद्देमाल जप्त.  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत शहिद चौक येथुन वेकोलि खदान चा कोळसा चोरुन कारने वाहतुक करणाऱ्या आरोपी ला कन्हान पोलीसांनी पकडुन मुद्देमाल जप्त करित पोस्टे ला गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.२४) सप्टेंबर ला दुपारी १२ वाजता दरम्यान फिर्यादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com