वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- फिर्यादी नामे आदील खान जुबेर खान, वय २७ वर्ष, रा. भानखेडा, तहसिल, नागपूर यांनी त्यांची हिरो एलेंडर प्रो गाडी के. एम.एच ४९ ए.ए ६५०२ किंमती अंदाजे ४०,०००/- रू. ची, मॅक्स हॉस्पीटल समोर, कोराडी रोड, फुटपाथवर पार्क करून, लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे मानकापूर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासात मानकापूर पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी नामे रमेश उर्फ रोहीत गुणाराम चंद्रपूरी, वय ३३ वर्ष, रा. मोठार, ता. उमरेड, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद वाहन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी गेलेली मोटरसायकल किंमती अंदाजे ४०,०००/- रू. ची जप्त करण्यात आली. आरोपीची सखोल विचारपूस केली असता, आरापीने पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत तसेच प्रतापनगर हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरापीने ताब्यातुन स्प्लेंडर क. एम.एच ४९ एस ७९६२ किंमती ५०,०००/- रू. ची व काळया रंगाची होन्डा शाईन क. एम.एच ३१ एफ.डी ७६१६ किंमती ५०,०००/- रु. ची तसेच प्लेहार गाडी क, एम.एच ३१ बी.ई ३५५९ किंमती ५०,०००/- रू. ची, अॅक्टीव्हा गाडी क. एम. एच ४९ ए.डी १३६१ किंमती ५०,०००/- रू. ची व एक विना नंबर प्लेट असलेली स्प्लेंडर गाडी किंमती ५०,०००/- रू. ची असा एकूण किंमती २,९०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नागपूर शहर, राहुल मदने, पोलीस उप आयुक्त (परि. क. २), सुनिता मेश्राम, सहा. पोलीस आयुक्त (सदर विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, मनिषा वरपे, पोउपनि, अमीत देशमुख, पोहवा. राजेश बरणे, राहुल गवई, नापोअं. विपीन रक्षे, मिलींद नासरे व प्रशांत खंडारे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मौदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतुकीचा धडाका सुरू, नागरिकांमध्ये संतापाचा कडेलोट...

Mon Jan 6 , 2025
नागपूर –  मौदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवैध रेती वाहतुकीचा उध्दट प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी भंडाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. अवैध वाहतुकीमुळे सरकारी महसूल बुडत असून रस्त्यांवरील ओव्हरलोड वाहतुकीमुळे अनेक अपघात घडत असल्याचेही समोर येत आहे. नागरिकांचा प्रशासनावर आरोप लोकांचे म्हणणे आहे की, येथील अधिकाऱ्यांनी “चोर चोर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!