– सि बि एस ई शाळेत 25% प्रवेश अनिवार्य
काटोल :- तालुक्यातील सिबीएसई शाळा शिक्षणाचा मूलभूत अधिकार (आर.टी. ई.)अंतर्गत शाळा मध्ये 25% प्रवेश समितीची सभा मंगळवारला गतसाधन केंद्र येथे पार पडली. शाळा सभेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात प्रवेश मार्गदर्शक बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेला समिती अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, सचिव ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, सदस्य दुर्गप्रसाद पांडे, ज्येष्ठ शिक्षक सुधीर बुटे, वंदना महल्ले , बाबाराव राठोड, केंद्रप्रमुख निळकंठ लोहकरे, रवींद्र इंगळे, दिलीप तुरकर, योगिता ब्राह्मणकर आदी सभेला उपस्थित होते .