चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

चंद्रपूर :-चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज २८ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस मित्र परिवार तसेच शहर महिला काँग्रेसतर्फे करण्यात आले होते.सकाळी 7 वाजता रितेश तिवारी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेऊन सकाळी 8 वाजता सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील रुग्णांना फळ वाटप केले.

सकाळी 9 वाजेपासून चंद्रपूर शहरातील किलबिल प्राथमिक शाळा रामनगर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स, धर्मराव नगर परिषद कन्या शाळा महाकाली वार्ड येथील विद्यार्थ्यांना थंड पाण्याची बॉटल, नवयुग उच्च प्राथमिक शाळा बाबुपेठ येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व टिफिन बॉक्सचे वितरण करण्यात आले.

दुपारी 12 वाजता कस्तुरबा चौक येथे आयोजित रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. काँग्रेस मित्र परिवार तसेच शहर महिला काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमामध्ये शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे, माजी नगरसेवक सुनीता अग्रवाल, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, प्राचार्य नरेंद्र बोबडे, पप्पू सिद्धीकी, नौशाद शेख, राहुल चौधरी, भालचंद्र दानव, राजेश वर्मा, राजू वासेकर, धर्मेंद्र तिवारी, सागर खोब्रागडे, काशिफ अली, राजीव खजांजी, गुंजन येरमे, मोनू रामटेके, प्रकाश देशभ्रतार, रेहान शेख, कुणाल तिवारी, विनीत डोंगरे, यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी .राव यांचे वनविभागात अतुलनीय योगदान - अजय पाटील

Mon Aug 28 , 2023
– सेवानिवृत्ती पर्यंत वनकर्मचाऱ्यांचे समस्या निवारणासाठी तत्परता.. नागपूर :- महाराष्ट्र राज्य वनक्षक व पदो. वनपाल संघटना , वन कर्मचारी व वन क्षेत्रीय कर्मचारी संघटना यांचे वतीने संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी आज दि.28/08/2023 रोजी  वाय. एल.पी.राव (भा. व.से.) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) म.राज्य नागपूर.हे दि.31/08/2023 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचे सन्मानार्थ निरोप समारंभाचे आयोजन वन भवन टकले सभागृहात आयोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com