झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा द्या – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुबई :- झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा देण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

अंधेरी पूर्व येथील के ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग आळवणी तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, या विभागातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या भितींच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने निधी उपलब्ध करून द्यावा. रस्ता बांधकामावेळी ज्यांचे घर तोडले जात असेल, त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी. शासनामार्फत अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनींच्या तक्रारीवर तातडीने निर्णय घ्यावा. शासकीय सामुग्रीची चोरी होत असलेल्या भागात सीसीटीव्ही बसवावेत व नुकसानग्रस्त भागाची दुरूस्ती करावी, असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी बैठकीत दिले.

नागरिकांनीच्या विविध 346 विषयासंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अधिका-यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रमामध्ये नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात तक्रार करण्यासाठी portal.mcgm.gov.in या लिंकचा वापर करता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ - जयंत पाटील

Tue Nov 15 , 2022
विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा… मुंबई : – मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा आहे. मात्र सर्वांगीण महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ कारण महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com