संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा युवा चेतना मंच तर्फे विविध सामाजिक उपक्रम व उत्कृष्ट सजावट करणाऱ्या गणेशोत्सव मडळांचा युवा चेतना मंच तर्फे दर वर्षी सम्मान करण्यात येतो . यावर्षी सुद्धा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बजरंग पार्क , उपराश गणेशोत्सव मंडळ नया बाजार , ओम साई मित्र मंडळ संजय नगर, श्री अष्टविनायक मित्र गणेश उत्सव मंडळ सोनार ओळीचा गजराज या मंडळांचा शेला व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी वरील मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते . ” विदर्भातील कमलापूर हत्ती कॅम्प वाचवा- विदर्भाचं वैभव वाचवा ” या सामाजिक विषयावर या वर्षी चे सम्मान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी गडचिरोली येथील कमलापुर हत्ती कॅम्प वाचवण्याकरता सर्व गणेश मंडळानातील पदाधिकारी व सदस्याना आव्हान करण्यात आले व आदोंलनास समर्थन देण्याचे आवहान करण्यात आले. याप्रसंगी अनिल गंडाईत , विनय कोंडुलवार , प्रमोद वर्नम , चंदन वर्नम, राहुल गुरव आदी गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते . युवा चेतना मंच चे प्रा. पराग सपाटे ,बॉबी महेंद्र ,मयूर गुरव, कुणाल सोलंकी, श्रीकांत अमृतकर , भुषण ढोमणे , पंकज ढोमणे ,अक्षय खोपे, अमोल नागपुरे, नितीन ठाकरे, नरेश सोरते आदी प्रामुख्याने उपस्थित होते .