कामठी तालुक्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-पांढरकवडा गावातील 11 गोवंश जनावरे लम्पी आजाराने बाधित

कामठी ता प्र 19 : गोवंशीय जनावरांमध्ये उदभवलेल्या विषाणूजन्य लम्पी चर्म रोगाचा कामठी तालुक्यात शिरकाव झाला असून आज 19 सप्टेंबर ला कामठी तालुक्यातील पांढरकवडा गावात 11 गोवंश जनावरे लम्पी चर्म रोगाने बाधित आढळले आहेत.

सध्या महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पशुधनामध्ये उदभवलेल्या लम्पी चर्म रोगाने थैमान घातले आहे. आज प्रथमता कामठी तालुक्यातील पांढरकवडा गावात तब्बल 11 गोवंश जनावरात विषाणूजन्य लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळुन आला आहे.माहिती मिळताच एसडीओ श्याम मदनूरकर, तहसिलदार अक्षय पोयाम, बीडीओ अंशुजा गराटे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ लीना पाटील यांनी पांढरकवडा गावात भेट देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच गावापासून 5 किमी परिघातील परिसरात लम्पी रोगाचे लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी येथील प्रशासन तत्पर असल्याचे मत एसडीओ मदनूरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

21टक्के मतदारांनी केले मतदार कार्ड आधारला लिंक.

Mon Sep 19 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 – केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येकाचे मतदान ओळखपत्र आधारकार्ड सोबत संलग्न करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार कामठी तालुक्यात 1 ऑगस्ट पासून मतदान ओळखपत्र आधार कार्डाशी जोडण्याची मोहीम सूरु आहे.या मोहिमेदरम्यान नागरीकाचे मतदान कार्ड सोबत आधार कार्ड जोडणी करून घेतले जात आहे याअंतर्गत 58 कामठी विधानसभा मतदार संघातील 21 टक्के मतदारांनी मतदार ओळखपत्र आधार कार्ड सह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com