बुधवारी राष्ट्रीय विज्ञान परिषदेत विविध कार्यक्रम

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरु असलेल्या 108व्या राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस आज बुधवारी ‘बाल विज्ञान काँग्रेसचे’ उद्घाटन, परिसंवाद, प्रदर्शन असे विविध कार्यक्रम असणार आहेत.

विद्यापीठाच्या मुख्य कार्यक्रमस्थळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी 9.30 वा. बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होणार आहे. यानंतर सकाळी 11 वा. गडकरी यांच्या हस्ते येथील ए. पी. जे. अब्दुल कलाम दालनात बाल विज्ञान काँग्रेस प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.

शहीद बिरसा मुंडा दालनात सकाळी 11 वा. पासून सायंकाळी 6 वाजे पर्यंत आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. ए.के. डोरले सभागृहात सकाळी 9 वा. पुरुष प्रजनन विषयावर परिसंवाद होणार आहे. तर डॉ रामानुजन सभागृहात सकाळी 10 वा. कोविडचे दिर्घकालीन परिणाम विषयावर परिसंवाद होईल. डॉ. ए के डोरले सभागृहात सकाळी 12 वा. ‘अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान’ विषयावर परिसंवाद होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मधुमेह- हृदयविकारातील नवीन घातक घटकांना वेळीच ओळखा - डॉ. शंतनू सेनगुप्ता

Wed Jan 4 , 2023
नागपूर, दि.4:- हृदयविकार आणि मधुमेह या नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास आले आहेत, हे घटक वेळीच ओळखून सजग राहून आपला बचाव करावा,असे प्रतिपादन डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी आज येथे केले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात ‘हृदयविकार आणि मधुमेह या विषयातील नवीन संशोधन’ याविषयावर चर्चा झाली. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com