संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-जुनी कामठी पोलिसांची फिल्मी स्टाईल ने सुगंधित तंबाकू तस्करबाजावर धाड,6 लक्ष 47 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 20:-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाकूची कामठी शहरात गुप्तचर पद्धतीने विक्री होत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच जुनी कामठी पोलिसांनी काल सयंकाळी 6 वाजता साई मन्दिर समोर फिल्मी स्टाईल ने घातलेल्या धाडीत सुगंधित तंबाकू सह इतर साहित्य असा एकूण 6 लक्ष 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश गाठले तर या कारवाहितील मुख्य आरोपी हा जुनी कामठी पोलीस स्टेशन चा शेजारी रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून या आरोपी चे नाव राकेश सुरेश वाही वय 37 वर्षे असे आहे तर दुसरा आरोपी हा तेलीपुरा येरखेडा रहिवासी असून आरोपीचे नाव प्रवीण वाघमारे वय 35 वर्षे असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कन्हान हुन कामठी कडे सुगंधित तंबाकू ची तस्कर होणार असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचून साई मन्दिर मार्गे पोलिसांची वाहन जात असता सुगंधित तंबाकू ची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाने पोलिसांची कार बघताच कामठी कडे जात असलेल्या या आरोपी चालकाने आपले चारचाकी वाहन यु टर्न करून कन्हान च्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी वेळीच सतर्कता साधुन फिल्मी स्टाईलचा वापर करून सुंगांधीत तंबाकू तस्कर वाहनासमोर पोलिसांची कार आडवी करून सदर वाहनावर धाड घालून वाहनातील दोन्ही आरोपीना वाहनासह ताब्यात घेऊन आरोपीवर कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.या धाडीतून सुगंधित तंबाकू ची तस्कर वाहतूक करणारे झायलो कार क्र एम एच 17 ए व्ही 9515 , एक महागडा मोबाईल व 10 बोऱ्यामध्ये सुगंधित तंबाकू ने भरून असलेले ईगल कंपनीचे 73 पाकीट असा एकूण 6 लक्ष 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी चिन्मय पंडित , एसीपी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ , वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल शिरे यांच्या नेतृत्वात डी बी स्कॉड चे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक के बी माकने, एपीआय आर गाढवे, ए एस आय किशोर मालोकर, डी बी स्कॉड चे संजय गीते,महेश कठाने, अंकुश गजभिये, श्रीकांत विष्णुरकर, आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे