संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 23 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शेख बुनकर कॉलोनी परिसरात मदरसा येथे कुराण शिकण्यास गेलेल्या एका दहा वर्षोय अल्पवयीन मुलावर मदरसा येथे शिककविणाऱ्या शिक्षकाने पीडित मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला असून या घटनेबाबत कुणाला वाच्यता केल्यास पीडित मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून यासंदर्भात बुनकर कॉलोनी रहिवासी पिडीत दहा वर्षीय मुलाने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला ताब्यात घेत आरोपी शिक्षका विरुद्ध भादवी कलम 377,506 R/W 4,6पोकसो कायद्यानुसार दाखल करण्यात आला असून अटक आरोपीचे नाव जुनेद हाफिज मास्टर वय 25 वर्षे रा.वारीसपुरा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार शैक्षणिक शिक्षनासह धार्मिक शिक्षण मिळावे या मुख्य उद्देशाने शेख बुनकर कॉलोनी येथील मस्जिद मदरस्यात कुराण शिकण्यास पीडित दहा वर्षोय मुलाला पाठविले असता आरोपी शिक्षकाने शिकवनी वर्ग सुटल्यानंतर पीडित मुलास थांबवून त्यास जमिनीवर उलटे झोपवुन अनैसर्गिक कृत्य केले व याबाबत कुणास वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार आज दुपारी साडे तीन वाजता घडली दरम्यान पीडित मुलाची प्रकृती बिघडल्याने त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केल्यावर घटना उघडकीस आली.यासंदर्भात फिर्यादी पीडित दहा वर्षोय मुलाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस पिल्ले करीत आहेत.