संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर अप रेल्वे लाईन जवळील चांभार नाला जवळ रेल्वे की मी नं 1117/13-15 रेल्वे मार्गावर एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने अनोळखी इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना रात्री 12 .38 वाजता घडली.
अनोळखी मृतकाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असून ओळख अजूनही पटलेली नाही.घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातात छिन्नभिन्न झालेले व वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले अनोळखी मृतदेहाचे धड,पाय,हात ,डोके एकत्र करून पुढील उत्तरीय तपासणीसाठी कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.