विद्यापीठात डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

अमरावती :-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्राच्यावतीने 28 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 3.30 वा. विद्यापीठातील अधिसभागृह येथे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर प्रमुख वक्ते म्हणून व्याख्यान देणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, विशेष अतिथी म्हणून आमदार अॅड. यशोमती ठाकूर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख राहणार आहे. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

व्याख्यान कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्राच्या प्राचार्य तथा कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. वर्षा देशमुख यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कौशल्यविषयक अभ्यासक्रमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

Sat Dec 24 , 2022
– गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्रश्नांचा आढावा नागपूर :- गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात आदिवासी भागातील मुलामुलींना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. विद्यापीठाने कौशल्यविषयक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. अशा सूचना राज्यपाल तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी दिल्या. आज राजभवनातील सभागृहात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या प्रश्नाबाबत आयोजित आढावा सभेत कोश्यारी बोलत होते. यावेळी वनमंत्री सुधीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com