केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सीओसी ला भेट

नागपूर :-शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनपात दाखल होताच थेट “श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ऑपरेशन सेंटर” सीओसी गाठले. ना. गडकरी यांनी शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. यादरम्यान अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंट, डागा लेआऊट, शंकर नगर, सीताबर्डी, नंदनवन चौक, समता नगर, नंदाजी नगर, भुतेश्वर नगर, वर्मा लेआऊट या भागांमधील पुरपरिस्थितीचा ना. गडकरी यांनी आढावा घेतला व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपायुक्त, सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव  संदीप जोशी, माजी महापौर माया इवनाते, माजी नगरसेवक सर्वश्री जितेंद्र (बंटी) कुकडे, संदीप जाधव, वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ना. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

Sun Sep 24 , 2023
नागपूर :- शनिवारी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नागपुरात निर्माण झालेल्या पूर सदृश्य परिस्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त सुनील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com