नागपूर :- फिर्यादी यांची अल्पवयीन पिडित मुलगी वय १७ वर्षे रा. कळमेश्वर हिने Instagram ID Shivam Sagar याचेशी मैत्री केली व अचानक घरून निघुन गेल्यावर फिर्यादीने पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे येवून रिपोर्ट दिली की त्यांची मुलगी ही घरी कुणालाही न सांगता निघुन गेली. त्यांनी Instagram ID Shivam Sagar या नावाच्या मुला सोबत निघुन गेल्याचा संशय दर्शविला होता. त्यावरून पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे अप. क्र. ४४८/२०२३ कलम ३६३ भा.द.वाँ अन्वये पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनैतिक मानवी वाहतुक नागपूर ग्रामीण येथील टिम दुवारे तपास हाती घेतल्यानंतर २०२२ मध्ये परत नमुद गुन्हयाचे विश्लेषण करून मिळालेल्या माहिती वर काम करून त्यावरून आरोपीचा नविन नंबर शोधुन त्याचे विश्लेषण करून सुरू असलेला नंबर मिळवून त्याचा कॅफ फॉर्म मिळवीला व सर्व विश्लेषणामध्ये त्याचा पत्ता दिल्ली येथे दिसुन आल्याने अनैतिक मानवी वाहतुक येथील पोलीस उप अधिक्षक राजेंद्र निकम, महिला पोलीस उपनिरीक्षक मौरा मटाले व महिला पोलीस हवालदार ज्योती वानखेडे, पोलीस हवालदार गजानंद निबेकर, पोलीस शिपाई ऋषभ उईके यांचे पथक यांनी दिल्ली ला रवाना होवुन दिनांक ०९/०६/ २०२३ रोजी आरोपी व पिडिता यांना ताब्यात घेण्यात आले. अनैतिक मानवी वाहतुक यांना सायबर सेलच्या पोलीस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर, महिला पोलीस हवालदार स्नेहलता घोपे, पोलीस नायक सतीश राठौड़ व पोलीस शिपाई मृणाल राउत तांत्रिक मदतीने गुन्हा उघडकीस आणण्यास मदत केली.