उमरेड :- पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी नागपूर जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत त्यांचे मार्गदर्शनाखाली अवैध धंदयावर कारवाई करीत असतांना दिनांक २१/०८/२०२३ रोजी पोलीस स्टेशन उमरेड येथील मौजा गोटेखानी बुधवारी पेठ माना येथे स्टाफ यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून आरोपी नामे- संतोष बबनराव गिरडकर वय ४५ वर्ष रा. बुधवारी पेठ उमरेड यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून १) होला कंपनीचा सुगंधीत तंबाखु ज्याचा प्रत्येकी १ नग पाकीट २०० ग्रॅ. किंमती १६४ रू. एकुण १३ बोऱ्या एकुण किमती ४४२०००/- २) ईंगल कंपनीचा सुगंधित तम्बाखु प्रत्येकी १ नग पॉकेट २०० ग्रॅम चा किंमत ३४०/- रू १३ बोऱ्या एकूण किमती १,८२,०००/-रु.३) रत्ना कंपनीचा सुगंधित तंबाखु ज्याचा प्रत्येकी १ बॉक्स ५०० ग्रॅमचा एकूण किंमती ११८० अशा एकुण ३ बोऱ्या किंमती ७८,०००/-रु. ४) बाबा ब्लॅक सुगंधित तंबाखु प्रत्येकी १ नगर २०० ग्रॅमचा टिनाचा डब्या किंमत ६४५ /- रू. एकुण १८ इब्बे किंमती एकुण किंमत ११,६१०/- रु. ५) मजा कंपनीचा सुगंधीत तंबाखु प्रत्येकी ०१ नग २०० ग्रॅमचा टिनाचा डब्बा कि. ९३५/- रु एकूण २० डब्बे एकूण किंमती १८,७००/-रु. ६) विमल पान मसाला प्रत्येकी १ नग ७८ ग्रॅम ज्याची कि. १२० असा एक बोरा किमत ७२,०००/- रु. ७) विमल १ सुगंधित तम्बाखु ने भरलेल्या ३ प्लॉस्टीक किंमत १८,०००/- रु. 8) रेनाल्ट कंपनीची डस्टर चार चाकी वाहन क्र. एम. एच. ४० ए. सी. २४०७ जिया बेवीस क्र. MEEHSRA36D30210 किमती ६,५०,०००/- रु. असा एकूण १४७२३१० /- मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. सदर आरोपीविरुद्ध कलम ३२८, २७२, २७३, १८८ भादंवी अन्वये गुन्हा नोंद असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे पोस्टे उमरेड हे करीत आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग उमरेड राजा पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे, पोलीस हवालदार प्रदीप चौरे, पोलीस नायक राधेश्याम कांबळे, पंकज बट्टे, पोलीस अंमलदार रोशन सहारे, महिला पोलीस अमलदार रूपाली भैसारे यांनी केली आहे.