टिप्परची मोटारसायकलला धडक दोन युवक गंभीर जखमी आमगाव गोरठा येथील घटना

अमरदिप बडगे

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील आमगाव गोंदिया मार्गावरील गोरठा परिसरात आमगाव कडून गोंदिया कडे जात असलेला टिप्पर क्र एम एच 35 ए जे 0394 याने दहेगाव कडून आमगाव कडे जाणारी मोटरसायकल क्र. एम एच 35 टी 5245 ला धडक दिल्याने मोटार चालक नितेश पुनाजी पारधी वय 22 वर्षे तसेच विजय लोकचंद उके वय 24 वर्षे दोन्ही राहणार दहेगाव असे गंभीर जखमीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की गंभीर जखमी असलेले नितेश पारधी व विजय उके हे दोघे दहेगाव वरून आमगाव येथे कामानिमित्त जात असतानी आमगाव कडून गोंदियाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या टिप्परने गोरठा जवळील मोडवर मोटारसायकलला धडक दिल्याने मोटर सायकल वर बसलेले दोन्ही युवकांच्या पाय तुटल्याने गंभीर दुखापत झाली असून या दोघांना गोंदिया येथील खाजगी बजाज रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले टिप्परने सायकलला धडक दिली तेव्हा टिप्पर चालक घटनास्थळावरून पळ काढला होता परंतु दहेगावच्या नागरिकांनी टिप्पर ला, अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला हे विशेष या घटनेची आमगाव पोलिसांनी दखल घेत टिप्पर चालक जावेद अफसर खान पठाण 24 वर्ष रा तिरोडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद जाधव करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू

Sat Jul 2 , 2022
नितीन लिल्हारे मोहाडी : विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून एक शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना मोहाडी तालुक्यातील काटेबाम्हणी पेट्रोल पंप समोर शनिवार दि. २ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.दुर्गा चवतमल राऊत (४२) रा. काटेबाम्हणी ता. मोहाडी असे मृत महिलेचे नाव आहे. शेतातून घराकडे जात असतांना अचानक तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील काटेबाम्हणी पेट्रोल पंप समोर वीज कोसळल्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!