संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन जवळील सर कस्तुरचंद डागा बाल सदन अनाथालयातून दोन अल्पवयीन बालके बेपत्ता झाल्याची घटना काल सायंकाळी 5.30 दरम्यान घडली असून बेपत्ता बालकांचे नावे रुद्राक्ष कुमार कपिल मेहतो वय 11 वर्षे व सिक्कीकूमार सुनील मंडल वय 10 वर्षे असे आहे. यासंदर्भात सदर दोन्ही बालके अनाथलयाची सुरक्षा भिंतहुन उडी मारून निघून गेले व कुणीतरी अज्ञात इसमाने त्याना फूस लावून पळवून नेले या आशयातून फिर्यादी सरोज गायकवाड रा खलाशी लाईन कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सूरु आहे.