– गुन्हेशाखा घरफोडी विरोधी पथकाची कामगिरी
नागपूर :- पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीत, प्लॉट नं. ०६ न्यू त्रिमूर्ती हाउसिंग सोसायटी, वर्धा रोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी शहानवाज निसार अहमद, वय ४८ हे घराला कुलूप लावून परिवारासह त्यांचे मुळ गावी बिहार राज्यात गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घराचे मुख्य दाराचे व मागील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून, घरातील एच. पी कंपनीचा लॅपटॉप व पोर्च मध्ये पार्क केलेली टियागो कार क. एम.पी १९ सि.बी ९५१२ असा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी घरी परत आल्यावर दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे सोनेगाव येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादवि. अन्वये गुन्हा नोंद होता.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा, घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून तसेच तांत्रीक तपास करून व सापळा रचुन आरोपी यश विष्णू गोनेकर वय २० वर्ष रा. क्वार्टर नं. ११४५, बिल्डींग न. ७३ माडा कॉलोनी, पोलीस ठाणे कपिलनगर यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता आरोपीने वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस नमुद गुन्हयात अटक करून त्यांनी गुन्हयात चोरी केलेली टियागो कार क. एम. पी. १९ सि.बी ९५१२ किमती २,५०,०००/- रु. व एक लॅपटॉप किमती १०,०००/- रु. असा एकुण २,६०,०००/- रु. या मुद्देमाल त्याचे ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई करीता पोलीस ठाणे सोनेगाव येथे ताब्यात देण्यात आले.
नमुद कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शना खाली सपोनि मयुर चौरसीया, पोउपनि बलराम झाडोळकर, पोहवा राजेश देशमुख नापोअ रवि अहोर प्रशात गभने, ओकांत उईके, प्रविण रोडे, पोअ. कुणाल मसराम, निलेश श्रीपात्रे, सुधिर पवार, पराग, अनंता, शेखर, मिथुन यांनी केली.