संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा आवंढी मार्गाने दोन इसम संशयित रित्या दुचाकीने वाहतूक करीत असता गस्तीवर असलेल्या नवीन कामठी पोलिसांनी सदर दोन्ही इसमाना ताब्यात घेत त्याच्याकडील साहित्याची झडती घेतली असता एक जुनी बंदूक ,एक लोखंडी बॅरेल,लोखंडी छररे,एक धारदार चाकू असे घातक शस्त्र अवैधरित्या वाहतूक करताना आढळले असता पोलिसांनी सदर इसमास दुचाकी व त्याच्याकडील साहित्यसह ताब्यात घेण्याची कारवाही आज दुपारी साडे 12 दरम्यान केली असून या दोन्ही आरोपी विरुद्ध अवैधरित्या घातक शस्त्र बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी भादवी कलम 3,4,25 भारतीय शस्त्र अधिनियम सहकलम 135 मुंबई पोलीस कायदा सह कलम 34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक आरोपीचे नाव हरी पंधरे वय 34 वर्षे रा देवेंद्र येडे यांच्या शिवारात आवंढी, तसेच राधेश्याम उईके वय 35 वर्षे रा आवंढी ग्रामपंचायत जवळ ,आवंढी तालुका कामठी असे आहे. हे दोन्ही आरोपी मूळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी असून यांच्याकडून एक दुचाकी डिस्कवर क्र एम एच 40 टी 7013 किमती 40 हजार व एक जुनी लोखंडी बंदूक ज्याचे सर्व पार्ट काढलेले,लोखंडी बेरेल ,गोल रिंग, एक चाकू, एक मोबाईल इतर साहित्य किमती 14 हजार 880 रुपये असा एकूण 54 हजार 880 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त ,एसीपी संतोष खांडेकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण रंदई,पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे,अनिल बाळराजे,विशाल मेश्राम,सुरेंद्र शेंडे,नसीम अन्सारी,विकास उईके,मिथुन शेरे, अमोल घुले,आकाश मनवर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे