नागपूर :- फिर्यादी अभिजीतसिंग मजितसिंग भाटीया वय २८ वर्षे, रा. फ्लॉट नं. २१३, वैशाली नगर, पाचपावली, नागपूर यांनी त्यांची टाटा एस गाडी क. एम.एच ४९ ए.टी २९८७ ही खालसा इंटरप्राजेस, वैशाली नगर, जयस्वाल सेलिब्रेशन समोर, पार्क करून लॉक करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे गाडीतील दोन बॅटरी किंमती ९,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पाचपावली पोलीसांनी तांत्रीक तपास करून आरोपींना निष्पन्न केले व सापळा रचुन आरोपी क. १) शेख निसबत नियाज अहमद वय १९ वर्ष रा. टेका, पाचपावली, नागपूर २) सोहेल खान तजमुल खान वय २१ वर्ष रा. माजरी, पार्वती नगर, कळमणा, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, आरोपींनी नमुद गुन्हयाची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन वरील गुन्हयातील दोन बॅटरीसह ईतर ठिकाणाहुन चोरी केलेल्या अशा एकुण ०५ बॅटरी व गुन्हयात वापरलेला ई-रिक्षा क. एम.एच ४९ बि.एन ७७२८ असा एकूण किंमती अंदाजे १,२४,५००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी निमीत गोयल पोलीस उप आयुक्त (परि. क. ३), अनिता भोरे सहा. पोलीस आयुक्त (कोतवाली विभाग), वपोनि, बाबुराव राऊत, सपोनि, सोमवंशी, नापोअं, ईमरान शेख, रोमेश मेनेवार, पोअं. राहुल बिकटे, गगन यादव, संतोष शेन्द्रे, पदमाकर उके व महेन्द्र सेलुकर यांनी केली.