ज्येष्ठ पत्रकार अरुण बाळकृष्ण फणशीकर यांचे निधन

नागपूर :- ज्येष्ठ पत्रकार, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अरुण बाळकृष्ण फणशीकर यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांचे वय 71 वर्षे होते. ते अविवाहित होते.

काल रात्रीपासून ते बेपत्ता होते. आज दुपारी गिरिपेठेतील घरच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. गेली काही वर्षे ते असाध्य रोगाने आजारी होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे.

अत्यंत मितभाषी, हुकमी बातमीदार म्हणून त्यांची ख्याती होती. हितवाद, इंडियन एक्स्प्रेस आणि हिंदुस्थान टाइम्स या तीन दैनिकांचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले.

नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि पत्रकार क्लब ऑफ नागपूर या तीनही संस्थांच्या वतीने प्रदीपकुमार मैत्र, शिरीष बोरकर, ब्रह्माशंकर त्रिपाठी या पदाधिकाऱ्यांसह अनेक पत्रकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

NewsToday24x7

Next Post

AVI फाउंडेशनच्या ४ अगस्त्य लॉ इंटर्नशिपला सुरुवात

Fri Jun 9 , 2023
नागपूर :- AVI फाउंडेशन, तिचे अध्यक्ष, डॉ. जेरिल बानाईत ही एक गैर-सरकारी, सामाजिक संस्था आहे. हे वन्यजीव, आरोग्यसेवा, पर्यावरण, शिक्षण आणि कायदेशीर सुधारणा या क्षेत्रात काम करते. AVI फाउंडेशन कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Aagstya- लॉ इंटर्नशिप आयोजित करते. या महिनाभराच्या इंटर्नशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी विविध विभागांमध्ये आरटीआय दाखल करणे आणि सध्याच्या ज्वलंत […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com